शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (20:04 IST)

तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये, सरकार त्यांना सर्व मदत करेल : जितेंद्र आव्हाड

रायगड जिल्ह्यातील महाड जवळ असलेल्या तळीये या गावातील 35 घरांवर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. तर अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर म्हाडाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट संपूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे म्हणाले.

तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाचे कॅबिनेट मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हणाले…

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती.