सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (21:00 IST)

म्हणून काँग्रेस नेते दीदीच्या अंत्यदर्शनाला अनुपस्थिती, पटोले यांनी दिली माहिती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. तर माझ्या बहिणीची सासु वारल्याने तिकडे गेलो होतो. मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते.
 
महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा काम केलंय असे नाना पटोले म्हणाले. तसेच अस्लम शेखसुद्धा मुंबईबाहेर होते वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या शनिवार रविवार मुळे अनेकांची दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. लतादीदींच्या परिवाराचे सांत्वन करण्यास जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.