गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2022 (13:36 IST)

नाशिक पोलीस अकादमी मध्येच चोरट्यांचा डल्ला

नाशिक मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. शहरात असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मधून चोरट्यांनी तीन चंदनाच्या वृक्षांची चोरी करून नेली आहे. राज्यभरातून ट्रेनिंग साठी इथे अनेक फौजदार येत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला असतो. चारही बाजूने सुरक्षा असलेला हा भाग आहे. सर्वत्र पोलिसांचा विळखा आणि वावर असलेल्या भागातून देखील चोरट्यांनी चंदनाच्या वृक्षांची चोरी केलेली आहे.
 
पोलीस अकादमीत असलेल्या कॅडेट मेसच्या पश्चिम भागात असलेल्या विहिरीजवळील भागातून चंदनाचे झाड बुंध्यापासून कापत चोरट्यांनी नेले आहे .या अगोदर देखील नाशिक शहरात बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरुन नेली होती. आता देखील पोलीस अकॅडमी मधूनच चोरट्यांनी चंदनाच्या झाडाची चोरी केल्याने सुरक्षा आणि बंदोबस्त वर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
 
24 तास पोलीस बंदोबस्त असलेल्या नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या निवासस्थानातून देखील मागील काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी चंदन चोरून नेण्याचा प्रकार घडला त्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस अकादमीतून चोरट्यांनी चंदन चे झाड बुंध्यापासून कापून नेले आहे त्यामुळे चोरट्यांनीच आता पोलिसांना आव्हान दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.या पोलीस अकादमीतील चंदन चोरी प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे