शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:38 IST)

हा बहुमताचा विजय, सत्याचा विजय, मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका पुढे घेऊन जाणार, हा बहुमताचा विजय, सत्याचा विजय आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
हा बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरुप झालेल्या आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो लाखो सैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटनेप्रमाणे कारभार चालतो. आणि आम्ही घेतला या राज्यात जी घटना आहे नियम आहे, कायदा आहे. आमचं सरकार या घटनेच्या आधारावर स्थापन झालं, कायद्याने नियमाने झालं, आजचा निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तो बाय मेरीट, मेरीटवर दिलेला निर्णय आहे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबाबत निवडणुक आयोगाला मनापासून धन्यवाद दिले.
 
राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, हा लोकशाहीचा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. आज आपण पाहिलं बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं, त्यामुळे घटना, कायदा, नियम हे सगळं बघितल्यानंतर बहुमतचं महत्त्वाचं असतं आणि ते बहुमत आमच्यासोबत आहे. त्यामुळे मेरीटवर निर्णय लागावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही, असही शिंदे म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor