शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:47 IST)

भुसावळमार्गे धावणार उधना ते जयनगर विशेष एक्स्प्रेस

train
भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने उधना ते जयनगर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून जाणार असल्याने विभागातील प्रवाशांची सोय होईल.
 
प्रवाशांची गर्दी वाढल्याने प्रशासनाने उधना ते जयनगर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ०९०३९ उधना जयनगर साप्ताहिक गाडी २१ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२४ पर्यंत दर बुधवारी उधना येथून रात्री ८.३५ वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जयनगरला सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. तर ०९०४० जयनगर – उधना गाडी जयनगर येथून २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत दर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता उधना येथे पोहोचेल.
 
या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला चलथान, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटणा, बरौनी, समस्तीपुर, दरभंगा, मधुबनी येथे थांबा आहे. गाडीला १० स्लीपर क्लास, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्डस् ब्रेक व्हॅन असतील.

Edited By - Ratnadeep Ranshoor