गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2024 (08:58 IST)

वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण

varsha gayakwad
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची  बैठक होणार होती. मात्र माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
 
यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही याआधी शिवसेना-भाजपा युतीत होतो. तेव्हाही भाजपाबरोबर एखाद-दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत आमचे मतभेद असायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तर आमचे नवे भिडू आहेत. त्यामुळे असे मतभेद होणार, जागावाटपात अशा अडचणी येणार हे आम्ही आधीपासूनच गृहित धरलं आहे. त्यात सांगली आणि भिवंडीचा तिढा निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईत अजिबात वाद नाही. ती आमची विद्यमान जागा असून आमच्याकडेच राहील. सांगलीची जागा आम्ही नव्याने घेतली आहे. तिथे परंपरेने काँग्रेसचे लोक निवडून आले आहेत. शिवसेनेची तिथे निवडणूक लढण्याची ताकद कमी आहे. मात्र मतदार मशाल या चिन्हावर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये तिथे काँग्रेस दिसली नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा तिथे ४ लाख मतांनी पराभव झाला होता. २०१९ ला काँग्रेसने ती जागा त्यांच्या मित्रपक्षासाठी सोडली होती. भावनिकदृष्ट्या काँग्रेस तिथे दावा करू शकते, मात्र त्यात तथ्य नाही.
 
Edited by Ratnadeep Ranshoor