महाराष्ट्रातील पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे विजय मिळाले असून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात पराभवाचे मुख्य कारण त्यांनी नानापटोले आणि संजय राऊत यांच्यामुळे झाल्याचे सांगितले आहे.
महाविकास आघाडीच्या 11 च्या बैठकीत हे दोघे नेते दुपारी 2 वाजता यायचे. त्यांच्या उशिरा येण्यामुळे सभा लांबल्या.या कारणास्तव आम्हाला इतर दुसऱ्या ठिकाणी प्रचार करता आला नाही. हे जाणूनबुजून केल्याचे असावे किंवा काही कटाचा भाग तर नाही. असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ,महाविकास आघाडीने सुमारे 20 दिवस जागांबाबत संदिग्धता कायम ठेवली होती.
महाविकास आघाडीचा नोव्हेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला. तेव्हा पासून माविआचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. निवडणुकीसाठी एकत्रित कार्यक्रम करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. आमच्या पराभवाचे हे प्रमुख कारण असेल असे मला वाटते.असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Edited By - Priya Dixit