सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (22:59 IST)

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? समीर वानखेडे म्हणाले

मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेळ होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केलाय. यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय. तसेच अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावं जाहीर करण्यास नकार दिला.
 
पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले की, जे नाव तुम्ही घेत आहात. सध्या तपास सुरु आहे आणि असं कुठलंही नाव घेणं योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलंही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतोत, जे पुरावे आहेत त्यावर बोलतोत. बाकी नाही, असं एनसीबी अधिकारी समिर वानखेडे म्हणाले.