शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (14:38 IST)

गौतमी पाटील आहे तरी कोण , आता व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा प्रकरामुळे पुन्हा चर्चेत , वाचूया व्हायरल सत्य काय आहे ते,

Photo- Instagram
गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
 
गौतमी पाटीलचे कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना चित्रिकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोनिका धुमाळ यांनी ही तक्रार दिली आहे. गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत. यातच रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले आहे. वरील
 
हे वृत्त आहे .. 
आता व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा प्रकरामुळे पुन्हा चर्चेत , वाचूया व्हायरल सत्य काय आहे ते, वाचा पूर्ण रिपोर्ट : गौतमी पाटील आहे तरी कोण?
 
सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील :
सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की ही गौतमी पाटील कोण? चला जाणून घेऊया…
 
इंस्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक
Photo- Instagram
गौतमी पाटील हे इंस्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. तिच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांना खरोखरच वेड लावले आहे. तिची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमते. मात्र गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याने मोठा वाद निर्माण केला आहे. तिच्या लावणी नृत्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तिचा डान्स आणि हावभाव सर्वच अश्लील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
 
सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आईचे आजारपण आणि खरची परिस्थिती यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. दरम्यान तिच्या शिक्षण आणि पुढील प्रवासाविषयी जाणून घेऊया.
 
गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची
गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.
 
आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.
 
गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते.
 
'गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो'
Photo- Instagram
पुण्यात गौतमीने जास्त कार्यक्रम केले. पण कौल्हापूरमध्ये तिने जास्त शो केले. तिथल्या प्रेक्षकांकडून आपल्याला जास्त प्रेम मिळाल्याचे ती सांगते.घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. काही दिवसांपुर्वी अश्लिल डान्स प्रकरणी गौतमी पाटीलवर टीका करण्यात आली होती.'गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो'च्या माध्यमातून मी लावणी करीत असते. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. असे असले तरीही इथून पुढे अश्लिल डान्स करणार नाही. लावणीचा अपमान होणार नसल्याचे ती सांगते.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor