मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

त्याने केले व्हाईटनर प्राशन, रोखल्या तीन रेल्वे, वाचा कुठे घडलेला हा भयानक प्रकार

एक तरुणाने नशेसाठी वापरात असलेल्या व्हाईटनर प्राशन केले, व ते घेऊन तो आत्महत्येसाठी रेल्वे रूळावर गेला, मात्र त्या तरुणाला काही झाले नाही तर तरुणामुळे तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. उपस्थित असलेल्या  नागरिकांनी त्या नशेडी तरुणाची  समजूत काढली तरीही हा  तरुण रेल्वे रूळाकडे जात असल्याने मोठा  गोंधळ उडाला होता. त्यामुळे वैतागलेल्या  नागरिकांनी पोलिसांनी लगेच बोलावले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. ही घटनां औरंगाबाद येथे घडली आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, व्हाईटनर प्राशन केलेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी औरंगाबादमधील देवानगरी येथील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ पोहोचला होता. त्यावेळी त्या परिसरातील नागरिकांनी  तरुणाला रोखण्याचे मोठे  प्रयत्न केले. तर त्याचवेळी  रेल्वे रूळावर गर्दी दिसल्याने येत असलेली ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस चालकाने प्रगवधान राखून थांबवली. यावेळी नागरिकांनी तरुणांची समजूत काढली. तेव्हा मी घरी जातो, असे सांगून तो घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी आला. यावेळी नगरसोल-नांदेड गाडी जात असताना समोर येऊन उभा राहिला.तेव्हा  रेल्वे थांबून काहीजणांनी त्याची पुन्हा समजूत काढली. तो परत गेला आणि थोड्या वेळाने मनमाड-काचिगुडा रेल्वे गाडीसमोर येऊन परत थांबला होता. त्यानंतर नागरिक आणि प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.
 
पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले. तोपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. या तरुणाकडील जवळपास चार हजार रूपये आणि मोबाईल काही मुलांनी काढून घेतला. तसेच त्याच्या अंगावर खाज येणारी काचकुरीही टाकली, असे त्या तरूणाने चौकशीत सांगितले. त्यामुळेच तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरूळावर आला होता. त्याच्या या आत्महत्येचा गोंधळ तासभर चालल्याने तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मात्र, विस्कळीत झाले.