1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:41 IST)

मित्रांच्या पैसे परत द्या या तकाद्यामुळे तरुणाची आत्महत्या, तीन महिन्यांनी गुन्हा दाखल

Young man commits suicide after three months Maharashtra News Regional News In Marathi
उधार घेतलेले पैसे पुन्हा दिले नहीत  तर संपूर्ण कुटुंबास बरबाद करून टाकू अशी धमकी मित्रांकडून  मिळाली म्हून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एप्रिल महिन्यात घडली होती .नाशिक येथील रहिवासी  गोकुळ कदम असे या युवकाचे नाव असून, त्याच्या आईने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून गोकुळला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पाच संशयित मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 
गोकुळची आई लता कदम (रा. संत नरहरी नगर,दसक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनंजय निमसे,अक्षय वाबळे, संपत बोराडे, वैभव बोराडे आणि आकाश वाजे या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळचा वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. गोकुळने अक्षयकडून पैसे घेतले होते. त्यापैकी काही पैसे गोकुळच्या वडिलांनी अक्षयला परत केले होते.उर्वरित पैशांसाठी अक्षय गोकुळकडे तगादा लावत असे. अक्षयने गोकुळला मारहाण करुन त्याचा फोनही काडून घेतला होता. गोकुळने आत्महत्या केल्याच्या आदल्या रात्री धनंजयने गोकुळचा उद्या गेमच करतो अशा शब्दांत फोनवरून गोकुळच्या आईला धमकावले होते. तसेच धनंजय, अक्षय, आकाश हे चॉपर घेवून आले होते आणि त्यांनी आपल्यासह नाना नरवाडे,दत्ता आढाव या मित्रांना मारहाण केल्याचे गोकुळने शेजारी नीलेश शिंदे यांना सांगितलेही होते. दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय निमसे याने घरी येवून गोकुळला शिवीगाळ, दमदाटी केली. दुपारपर्यंत पैसे न दिल्यास कुटुंब बरबाद करण्याची धमकीही दिली. दबावाखाली आलेल्या गोकुळने त्यानंतर घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती.