सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :औरंगाबाद , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (15:06 IST)

स्टोरी ठेवून तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल तलावात उडी घेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला धोका मिळाला असल्याचं मित्रांना सांगितलं होतं. त्यानंतर संबंधित तरुणानं इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अग्निशमन दलाने गेली पाच दिवस हर्सूल तलावात शोधमोहीम राबवल्यानंतर, संबंधित मुलाचा मृतदेह आढळला आहे. 
 
तसेच ‘मी आता तलावात उडी घेत असून हा माझा शेवटचा कॉल असेल,’ असं सांगितलं. यानंतर मित्र परिवाराने तात्काळ हर्सूल तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी कुणालची दुचाकी आढळून आली. तर त्याची चप्पल पाण्यात तरंगताना आढळली. कुणालने उडी घेतल्याचं कळताच मित्रांनी हर्सूल तलावावरील सुरक्षारक्षक राजेश गवळे यांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांसह अग्निशामक दलाला पाचारण केलं. हर्सूल तलावात पाच दिवस शोधकार्य केल्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह आढळून आला आहे.
 
आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने ‘आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, पर उन हजारों मे हम नही’ अशी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती. कुणालने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.