गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मे 2022 (14:53 IST)

तरुणाला धरणात फेकून दिल्याच्या घटनेचा झाला उलगडा; अनैतिक संबधातून खून, दोन जणांना अटक

arrest
नाशिक तालूक्यातील नांदूर येथील अमेल धोंडीराम व्हडगर या २२ वर्षीय तरुणाचा गळा हातपाय दोराने बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून देवून खून करण्यात ल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. या घटने नंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर सोनू साहेबराव केसकर व गोविंद वाळू केसकर या दोघा संशयितांना आज सायंकाळी अटक केलीय. अमेल व्हडगर याचा अनैतिक प्रकारातून दोघांनी खून केल्याच पोलिस तपासात समोर आले आहे.
 
गावातील वरातीत नाचून येतो अस सांगून तो रविवारी रात्री घरातून निघून गेला, मात्र त्या नंतर तो घरी परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला अखेर काल (मंगळवारी) त्याचा मृतदेह धरणात आढळून आला. त्याचा मृतदेह सांडव्याजवळ तरंगताना आढळून आल्याचे काही नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करुन या खूनाचा उलगडा केला.