मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

बॉलीवूड 2008 : एक पाऊल पुढे, तर दोन मागे

IFMIFM
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी (2008) बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत 'मंदी'च दिसून आली. कोट्यवधी रूपयांचे मानधन घेणारे स्टार्स आणि बिगबजेट चित्रपट पत्त्यासारखे कोसळले. हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांनी रेकॉर्ड केले. वर्षाखेरीस सलमान, शाहरूख आणि आमीर या खान त्रिकुटांच्या चित्रपटांमुळे बॉलीवूडमध्ये किमान उत्साह तरी आहे. चित्रपटांचा ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न यावर्षी झाला. कॉमेडी चित्रपटांबरोबरच कौटुंबिक आणि एक्शन चित्रपटांची निर्मिती झाली. तारे जमीन पर, दोस्तानासारखे हटके चित्रपटही पहायला मिळाले. मात्र, एकूणच बॉलीवूडला हे वर्ष 'एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे' असेच गेले.

सुपरहिट चित्रपट
छोट्या खेड्यातून लंडनसारख्या मोठ्या शहरात गाजणारा चित्रपट अशी सुपरहिट चित्रपटाची व्याख्या केली तर यावर्षी कोणताच चित्रपट सुपरहिट ठरला नाही. ‘सिंह इज किंग’ चे कलेक्शन जोरदार झाले. पण, हा चित्रपट एवढ्या महागात विकण्यात आला की, अनेक ठिकाणी वितरकांना तोटा सहन करावा लागला. तरीही आपण त्याला सुपरहिट चित्रपट म्हणू शकतो. प्रेक्षकांना कथा, दिग्दर्शन या बाबींशी काहीच देणेघेणे नव्हते. अक्षय कुमार काय धिंगाणा घालतो यातच त्यांना रस होता. आमीर खान निर्मित ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट आपण यशस्वी म्हणू शकतो. दहा कोटी रूपयांच्या या चित्रपटाने जवळपास 70 कोटींचा गल्ला जमवला. वर्षाखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आदित्य आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा गाजली. ‘गोलमाल रिटर्न’ या चित्रपटानेही बाजी मारली.

WD
हिट चित्रपट
रेस, जोधा-अकबर आणि जन्नत हे चित्रपट हिट म्हणता येतील. जोधा-अकबरने भारताबरोबरच परदेशातही चांगले यश मिळवले. आशुतोष गोवारीकर यांच्या मेहनतीला यश आले. ह्रतिकच्या तुलनेन ऐश्वर्या राय लोकांना जास्त आवडली. ‘रेस’ ची ओपनिंग जोरदार झाली. पण, हा चित्रपट फार चालू शकला नाही. ‘जन्नत’च्या बाबतीत असेच घडले. ‘रॉक ऑन’ ने युवकांना आकर्षित केले आणि फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, प्राची देसाई सारखे कलाकार असूनही या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले.

सर्वसाधारण चित्रपट
'दोस्ताना' हा चित्रपट महागात विकण्यात आल्यामुळे चित्रपटावर परिणाम झाला. हा चित्रपट केवळ मोठ्या शहरातच चालला. ‘गे’ संबंधांवर आधारित विषय भारतीयांसाठी नवीन होता. मधुर भंडारकर यांचा ‘फॅशन’ बुद्धिजीवी प्रेक्षकांना आवडला. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या रामगोपाल वर्मा यांनी ‘सरकार राज’च्या माध्यमातून यश मिळवले. वेलकम टू सज्जनपुर, ए वेडनसडे, 1920, फूँक सारखे चित्रपट ताकदीच्या कथानकामुळे यशस्वी ठरले.


फ्लॉप चित्रपट
बॉलीवूडच्या गल्लीत फ्लॉप चित्रपटांचीही गर्दी झाली. जोरदार चर्चा होऊनही काही चित्रपटांनी घोर निराशा केली. यशराज फिल्म्सच्या सगळ्या‍च चित्रपटांबाबत अपेक्षा असते. पण, रोड साइड रोमियो, टशन, थोडा प्यार थोडा मॅजिक हे चित्रपट साफ आपटले. टशनसारखा चित्रपट पाहिल्यावर यशराज बॅनरची प्रतिष्ठा खालावल्याचेही स्पष्ट होते. हॅरी बावेजा यांनी मुलगा हरमनला लॉन्च करण्यासाठी ‘लव स्टोरी 2050’ काढला, पण तो फ्लॉप ठरला. अमिताभ, सलमान आणि प्रियंका सारखे स्टार्स ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ ला बुडण्यापासून वाचवू शकले नाहीत. सुभाष घई यांनी ‘युवराज’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा अपयशाचे तोंड पाहिले. बिग बजेट चित्रपट सपाटून आपटत असताना कमी बजेटचे चित्रपटही चालले नाहीत. सॉरी भाई, ओ माय गॉड, महारथी, दिल कबड्डी, मुंबई मेरी जान, आमीर, दसविदानिया सारखे चित्रपट सो-सो चालले.


आर्थिक मंदीचा झटका
यंदा बॉलीवूडलाही मंदीचा झटका बसला. 2008 च्या सुरूवातीस कोट्यवधीचे सौदे झाले होते. स्टार्स कलाकारांना मागेल तेवढी रक्कम दिली जात होती, पण, नंतर अनेक कार्पोरेट संस्थांनी आपल्या ऑफिसला टाळे ठोकले. नवीन चित्रपट ठप्प झाले. निर्मात्यांना थोडा तरी फायदा मिळावा म्हणून कलाकारांना आपला दर कमी करावा लागला. तरीही चित्रपट निर्मितीवर परीणाम झाला. आता याचे परिणाम 2009 च्या अखेरीस दिसून येतील.


यांची साथ मिळाली
यावर्षी बॉलीवूडमध्ये भरपूर प्रमाणात नवे कलाकार आले. सोनल चौहान, मुग्धा गोडसे, अनुष्का शर्मा, अदा शर्मा, सहाना गोस्वामी, प्राची देसाई, असीन, श्वेता कुमार, इमरान खान, रजनीश दुग्गल, फरहान अख्तर, हरमन बावेजा, सुशांत सिंह, मिमोह चक्रवर्ती, अध्ययन सुमन, सिकंदर खेर, राजीव खंडेलवाल हे नवे चेहरे लक्षवेधी ठरले. यातील अनेकांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसून येत आहे.

IFM
यांनी केला अलविदा
चित्रपटांशी संलग्न अनेक लोकांनी बॉलीवूडला अलविदा केला. यातील प्रमुख खालीलप्रमाणे आहेत -
* 13 फेब्रुवारी - राजेंद्रनाथ (76) (कॉमेडियन)
प्रमुख चित्रपट : दिल दे के देखो, प्यार का मौसम, तीसरी मंजिल, एन इवनिंग इन पेरिस, फिर वही दिल लाया हू

WD
* 10 एप्रिल - शोमू मुखर्जी : निर्माता/दिग्दर्शक (तनूजाचे पती आणि काजोलचे वडील)
प्रमुख चित्रपट - फिफ्टी-फिफ्टी, संगदिल सनम, एक बार मुस्कुरा दो

* 19 में - विजय तेंडुलकर (प्रसिद्ध साहि‍त्यीक)
हिंदी पटकथा - निशांत, मंथन, अर्द्धसत्य, आक्रोश

* 7 जुलै - एफ.सी. मेहरा (80) ( फिल्म निर्माता)
प्रमुख चित्रपट - आम्रपाली, प्रोफेसर, उजाला, लाल पत्थर

* 29 ऑगस्ट - जयश्री गड़कर (68) (मराठी आणि हिंदी चित्रपटतारका)
प्रमुख चित्रपट - झनक-झनक पायल बाजे, ईश्वर, मास्टरजी, ससुराल

* 27 सप्टेंमर - महेंद्र कपूर (74) (पार्श्व गायक, पद्मश्री आणि मध्यप्रदेश शासनच्या लता अलंकरणदे सन्मानीत)

* 5 नोव्हेंबर - बलदेव राज चोप्रा (निर्माता-निर्देशक)
महाभारत मालिकेचे प्रणेते. नया दौर, कानून, वक्त, इंसाफ का तराजू आदीं चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक

*10 डिसेंबर - बेगम पारा
पन्नासच्या दशकातील बिनधास्त हिरॉइन. शेवटचा चित्रपट - साँवरिया, चाँद, उस्ताद पेड्रो

पुरस्कार आणि पारितोषिक
*सर्वोत्तम चि‍त्रपट - पुल्लीजानम
*सर्वोत्तम लोकप्रिय चि‍त्रपट - लगे रहो मुन्नाभाई
*सर्वोत्तम हिंदी चित्रपट - खोसला का घोसला
*सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक - मधुर भंडारकर
*सर्वश्रेष्ठ अभिनेता - सौमित्र चटर्जी
*सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - प्रिया मणी
*सर्वोत्तम गीत - लगे रहो मुन्नाभाई
*सर्वश्रेष्ठ पटकथा - लगे रहो मुन्नाभाई
*सर्वोत्तम पार्श्वगायक - गुरदास मान
*सर्वोत्तम पार्श्वगायिका - आरती अंकलीकर
*इंदिरा गांधी अवार्ड प्रथम दि‍ग्दर्शक चित्रपट - काबुल एक्सप्रेस

दादासाहेब फाळके पुरस्कार तपन सिन्हा यांना देण्यात आला. आशा भोसले यांना पद्मविभूषण मिळाला तर माधुरी दीक्षित, टॉम अल्टर, मनोज नाइट श्यामलन हे पद्मश्रीने सन्मानित झाले. शाहरुख खानला दोन मोठे पुरस्कार मिळाले. फ्रान्स सरकारने त्याला 'ऑर्डर ऑफ आर्ट एंड लेटर्स' देऊन सन्मानित केले तर मलेशिया सरकारने त्याला ‘दातूक शाहरुख खान’ म्हणून सन्मान केला. नितिन मुकेश यांना मध्यप्रदेश शासनाचा लता अलंकरण (वर्ष 2007) तर मनोज कुमार यांना मध्यप्रदेश शासनाने किशोर कुमार सन्मान (वर्ष 2007) दिला.