बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (23:32 IST)

सुमी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सांगितले - खाण्यापिण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे

सोमवारी युक्रेनच्या शेजारील देशांमधून एकूण 1,314 भारतीयांना सात नागरी विमानांद्वारे मायदेशी आणण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही माहिती दिली.
 
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, सुमीमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने एक व्हिडिओ जारी करून आपल्या संघर्षाबद्दल  सांगितले आहे.  गेल्या 10 दिवसांपासून सुमीमध्ये अडकल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. इतके दिवस तो नुसता वाट पाहत आहे, पण अद्याप काही मार्ग सापडत नाही.
 
व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्याने सांगितले की तो सुमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय विद्यार्थी आहे. तो जिथे अडकला आहे, तिथे गेल्या अनेक दिवसांपासून वीज नाही. यासोबतच आता खाण्यापिण्याच्या वस्तूंबाबतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरातील दुकानदार कार्ड घेत नाहीत. एटीएम मशीनमध्ये रोकड संपली आहे. अशा स्थितीत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू मागवण्यात अडचणी येत आहे.
 
सुमीमध्ये सुमारे 700 भारतीय विद्यार्थी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. भारत सरकार आपल्या नागरिकांना सुमीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जोरदार गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुमीमध्ये अडकलेला आणखी एक भारतीय विद्यार्थी आशिक हुसेन सरकार म्हणाला की, आम्ही निराश झालो आहोत. आम्ही अजूनही मदतीची वाट पाहत आहोत.
 
 एकूण 1,314 भारतीयांना सोमवारी युक्रेनच्या शेजारील देशांमधून सात नागरी विमानांद्वारे मायदेशी आणण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की 400 हून अधिक भारतीयांना परत आणण्यासाठी मंगळवारी रोमानियातील सुसेवा येथून दोन विशेष उड्डाणे चालविली जाण्याची अपेक्षा आहे.