बॉलीवूड म्हणते, सचिन क्रिकेटचा देवता
एकदिवसीय सामन्यात पहिला द्विशतक करणार्या सचिन तेंडुलकरवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यामध्ये आता बॉलीवूडही मागे नाही. टि्वटवर बॉलीवूडने सचिनला क्रिकेटचा देवता ही उपाधी दिली आहे. सचिनने समस्य देशवासियांना मोठा आनंद दिल्याचे बॉलीवूडने म्हटले आहे. बॉलीवूडचा बादशाह अमिताभने आपल्या ब्लागमध्ये म्हटले आहे की, द्विशतकाबद्दल मी सचिनला अभिनंदनाचा एसएमएस पाठवत आहे. शाहरुखच्या मुलीने सचिनवर एक कविताचा लिहल्याची माहिती त्याने दिली. अभिषेक बच्चने सचिनने देशाचे नाव मोठे केल्याचे म्हटले आहे. तो क्रिकेटचा देवता असून मी त्याला पहिले आहे. पाच फुट पाच इंच लांबीचा हा देवता सचिनच आहे. तेंडुलकर बप्पा मोरया...असे अभिषेकने लिहिले आहे. प्रियंका चोपडाने सचिनला पाहण्याचे भाग्य आपणास मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. शाहिद कपूने सचिन महान खेळाडू असल्याचे म्हटले आहे. सचिन हा माझा हिरो असल्याचे प्रीती झिंटाने म्हटले आहे. रितेश देशमुखने सचिनले इतिहास निर्माण केल्याचे आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.