Last Modified: ग्वाल्हेर , गुरूवार, 25 फेब्रुवारी 2010 (11:59 IST)
सचिनचा चांदीची बॅट देऊन सत्कार
PR
PR
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी 20 वर्ष पूर्ण केली असून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्वीशतक झळकविणाला पहिला फलदांज म्हणून त्याने नवा इतिहास रचला आहे. मध्यप्रदेश क्रिकेट संघ व ग्वालियर डिव्हिजन क्रिकेट संघाच्या वतीने (जीडीसीए) सचिनाला चांदीची बॅट देऊन सन्मानीत करण्यात आले.
सचिनने कॅप्टन रूपसिंह स्टेडियमवर बुधवारी दक्षिण आफ्रीकेविरुध्द झालेल्या दुसर्या वन-डे सामन्यात द्वीशतक (नाबाद 200) आपल्या नावे केले.
जीडीसीएकडून याशिवाय सचिनला दहा लाख रुपये रोख पुरस्कार देऊन येथील स्टेडियमच्या एका तंबूला सचिनचे नाव देण्याचे जाहीर केले आहे.