Last Modified: ग्वाल्हेर , गुरूवार, 25 फेब्रुवारी 2010 (15:19 IST)
सचिनचे द्विशतक देशवासियांना अर्पण
गेल्या 20 वर्षांत माझ्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्ये सतत माझ्या सोबत राहणार्या तमाम देशवासियांना माझे द्विशतक मी अर्पण करीत आहे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सचिन म्हणाला, की माझ्या सुखात आणि दु:खातही सतत माझ्या पाठीमागे राहणार्या देशवासियांना ही द्विशतकी खेळी अर्पण करीत आहे. आज सुरुवातीला मोठी खेळी करण्याचा विचार केला होतो. परंतु द्विशतक करेल, ही अपेक्षा नव्हती. जेव्हा 175 धावा केल्या आणि 42 षटकेच झाली होती तेव्हा मला वाटले की आज द्विशतकाची संधी आहे. परंतु 190 धावा झाल्यावर त्यासाठी मी प्रयत्न करु लागलो.
युसूफ पठाण, दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनी यांचेही सचिनने कौतूक केले. या खेळीमुळे आपली तंदुरुस्ती चाचणीही झाल्याचे त्याने सांगितले. द्विशतक केल्यानंतर पुन्हा 50 षटके आपण मैदानावर होतो.