1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया!

WD
एकदा एक जपानी व्यक्ती संताच्या टॅक्सीत येउन बसली, संताने टॅक्सी सुरु केली. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
संता "८०० रुपये"
"एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया"