शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (15:48 IST)

Pitru Paksha 2022 कधी आणि कोणत्या तारीखेला कोणतं श्राद्ध? जाणून घ्या सविस्तर माहिती

pitru paksh 2022
पितृपक्ष हा पितरांच्या स्मरणाचा काळ आहे. यंदा पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022, शनिवार ते 25 सप्टेंबर 2022, रविवार पर्यंत असेल. पितरांचे ऋण फेडण्याचा या काळात पिंडदानाचे महत्तव असते. या दरम्यान पितरांच्या पुण्यतिथीला श्राद्ध केले जाते. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून केलेले पिंडदान थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे.
 
मुहूर्त 
शास्त्रानुसार पितृपक्ष श्राद्ध आणि पर्वश्राद्ध करण्याचा मुहूर्त म्हणजे कुटूप मुहूर्त आणि रोहिणी मुहूर्त. चला जाणून घेऊया या दिवसाचे कुटूप आणि रोहिणी मुहूर्त.
 
कुटूप मुहूर्त – दुपारी 12.10 ते ते दुपारी 01.00
रोहणी मुहूर्त – दुपारी 01.00 ते 01.48
अपराह्न मुहूर्त– 01.49 अपराह्न ते 04.16 अपराह्न
 
कधी आणि कोणत्या तारखेला कोणतं श्राद्ध जाणून घ्या-
 
10 सप्टेंबर – प्रतिपदा श्राद्ध
11 सप्टेंबर – द्वितीयेचे श्राद्ध
12 सप्टेंबर – तृतीयेचे श्राद्ध
13 सप्टेंबर – चतुर्थी श्राद्ध
14 सप्टेंबर – पंचमीचे श्राद्ध, भरणी नक्षत्राचे श्राद्ध
15 सप्टेंबर – षष्ठीचे श्राद्ध, कृतिका नक्षत्राचे श्राद्ध
16 सप्टेंबर – सप्तमी श्राद्ध
17 सप्टेंबर – या दिवशी श्राद्ध नाही
18 सप्टेंबर – अष्टमी श्राद्ध
19 सप्टेंबर – नवमी श्राद्ध, सौभाग्यवती श्राद्ध
20 सप्टेंबर – दशमी श्राद्ध
21 सप्टेंबर - एकादशी श्राद्ध
22 सप्टेंबर - द्वादशी श्राद्ध
23 सप्टेंबर - त्रयोदशी श्राद्ध
24 सप्टेंबर - चतुर्दशी श्राद्ध
25 सप्टेंबर - सर्वपितृ अमावस्या श्राद्ध