रविवार, 26 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (11:20 IST)

श्राद्धात असणारे खाद्य पदार्थ आणि कावळ्याचे महत्व

shraddha food
वरण- भात
तांदळाची खीर
भजी टाकून कढी, 
पुऱ्या, 
पाटवडी (डाळीच्या पिठाच्या वड्या), 
पाटवड्याची भाजी, 
वडे (उडदाच्या डाळीचे किंवा हरभरा डाळीचे वडे) 
घारगे 
अळुवडी
भाज्या (मेथी, कारले, गवार, भेंडी, लाल भोपळा यापैकी)
कोशिंबीर (पेरू, केळी, डाळींब, सफरचंद, काकडी या फळांची)
लिंबू आणि आल्याचा तुकडा
पदार्थात करताना कांदा, लसूण वापरू नये.
 
श्राद्धाचे जेवण कावळ्याचे देण्याचे महत्त्व आहे. कावळ्यांना पितरांचे रुप मानले गेले आहे. श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्याच्या रुपात नियत तिथीला दुपारी घरी येतात. त्यांना श्राद्ध मिळाले नाही तर रुष्ट होतात. याच कारणामुळे श्राद्धाचा प्रथम अंश कावळ्यांना दिला जातो.

या व्यतिरिक्त केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन वाढू नये. शास्त्रांप्रमाणे याने पितृ तृप्त होत नाही.