सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा.
 
या दरम्यान कोणत्याही पशू- पक्ष्यांचा परेशान किंवा जखमी करू नये. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. पशू-पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे.
 
ब्रह्मचर्याचे पालक करावे. तसेच आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये.  
 
या दरम्यान शिळं अन्न खाऊ नये. याव्यतिरिक्त चणे, मसूर, साग, सातू, जिरं, मुळी, काळं मीठ, काकडी आणि दुधी भोपळा खाणे टाळावे.
 
या दरम्यान श्राद्ध स्वत:च्या घरात किंवा गया, प्रयाग, बद्रीनाथ आणि इतर स्थळी श्राद्ध करू शकता परंतू दुसर्‍यांच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही.  
 
या दरम्यान झाडं कापू नये. याने पितरं नाराज होऊ शकतात.
 
सात्त्विक आणि धार्मिक विचारांच्या ब्राह्मणाला केवळ मध्याह्न दरम्यान भोजन करवावे.
 
श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर या दिवशी घरात दुसर्‍यांदा भोजन निषिद्ध आहे.  
 
या दरम्यान नवीन वस्त्र धारण करू नये. नवीन वस्त्र किंवा वस्तू खरेदी करू नये.  
 
खोटे बोलणे, अनैतिक काम करणे, कोणासाठी वाईट विचार मनात ठेवणे चुकीचं ठरेल.