बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (08:40 IST)

Rudraksha Upay रुद्राक्षचा एक लहानसा उपाय कुंडलीतील 7 दोष दूर करेल

shravan
पुण्य-पवित्र श्रावण महिन्यात शिव पूजेला विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात, संपूर्ण महिनाभर भगवान महादेवाचा अभिषेक केल्याने पुण्य लाभ मिळतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की श्रावण महिन्यात एका लहानश्या उपायाने आपल्या जन्म पत्रिकेत असलेले वाईट 
 
आणि गंभीर दोषांचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात. माहित नसेल तर ही विशेष माहिती आज आम्ही आपल्या समक्ष घेऊन प्रस्तुत आहोत.
 
रुद्राक्ष धारण केल्याने दोष निवारण- आपल्या शास्त्रांमध्ये रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. अशी आख्यायिका आहे की रुद्राक्ष हा भगवान शिवाच्या डोळ्यातील अश्रू आहे. रुद्राक्ष एक ते चौदा मुखापर्यंत आढळतो. एक मुखी रुद्राक्ष हा अत्यंत दुर्मिळ तसेच भगवान शंकराचे थेट रूप मानले जाते.
 
श्रावण महिन्यात योग्य रुद्राक्ष धारण केल्याने जन्म कुंडलीत असलेल्या अशुभ योगाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात आणि लाभ मिळू शकतो. कुंडलीत कोणत्या दोषांसाठी कोणते रुद्राक्ष श्रावण महिन्यात परिधान करणे श्रेयस्कर आहे हे जाण़न घ्या-
 
1. मांगलिक योग- मांगलिक योग शांतीसाठी 11 मुखी रुद्राक्ष घालणे फायदेशीर आहे.
 
2. ग्रहण योग- 2 आणि 8 मुखी रुद्राक्षाचे लॉकेट घालणे ग्रहण योग शांतीसाठी फायदेशीर आहे.
 
3. केमद्रुम योग- चांदीमध्ये 13 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने केद्रम योग शांततेसाठी फायदेशीर ठरतं.
 
4. शकट योग- 10 मुखी रुद्राक्ष धारण करणे शकट योग शांतीसाठी फायदेशीर आहे.
 
5. कालसर्प दोष- काल सर्प दोषाच्या शांतीसाठी 8 आणि 9 मुखी रुद्राक्ष लॉकेट घालणे फायदेशीर आहे.
 
6. अंगारक योग- अंगारक योग शांतीसाठी 3 मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे.
 
7. चांडाळ दोष- 5 आणि 10 मुखी रुद्राक्षाचे लॉकेट घालणे चांडाळ दोष शांतीसाठी फायदेशीर आहे.
 
(विशेष- नमूद केलेल्या उपायांच्या योग्य फायद्यासाठी रुद्राक्ष मूळ आणि शुद्ध असणे अनिवार्य आहे.)