गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

दिव्याची अमावस्या पूजन विधी, इडापिडा टळेल

दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. 
 
या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.
पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. 
पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी.
फुलांची आरास करावी.
सर्व दिवे प्रज्वलित करावेत.
हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी
आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी
कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा.
या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
अर्थात 
‘‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.
 
त्यानंतर दिव्यांची कहाणी करावी. 
 
घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.