कहाणी सोमवारची

shravan somvar katha
Last Modified मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (13:28 IST)
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला चार बायका होत्या. राजानं एकेकीला एकेक काम वाटून दिलं. पहिलीला दूधदुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करावयास सांगितली. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं पुढं बायकाबायकांत भांडणं लागली. एक म्हणे, तूच का मुलांबाळांचं करावंसं? दुधदुभत्याचं का करुन नये? दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करु नये? तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीण बाई व्हावे? अशी आपली चौघींची भांडणं लागली.
हे एके दिवशी राजाचे कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला. कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसान दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं, राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. चारी राण्यांना एका ठायी हाक मारली, भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली, मीच का असं करावं? दुसरी म्हणाली, मीचा का असं करावं? अशी आपली चौघींनी कारणं सांगितली, राजा म्हणाला, मला आपली ह्यांना हीच कामं सांगाविशी वाटतात.
तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून कांढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं अगं, तुला दुधदुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो. तर मग ऐक आता. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानांत नेहमी चरत असीस. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर दोन प्रहरी त्याजवर तूं दुधाच्या धारा धरीस, त्याजवर अभिषेक करीस, त्यामुळं तुला हा जन्म आला.
राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं, ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली. ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग. म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. अशा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखासमाधानानं वागू लागली.
पुढं काय झालं? ऋषी दुसर्‍या राणीकडे वळले. तिला विचारलं तू का गं भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीण व्हावं? ह्याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई बाई, आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागत असीस. तेव्हा दर सोमवारी उपास करीस, भिक्षेला जास, पाचच घरी कोरान्न मागस, त्याचा स्वयंपाक करुन महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं, ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल. अंती तुला कैलास लाभेल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली.

पुढं ऋषी तिसर्‍या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस, स्वत: आपण उपास करीस, असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली, ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग, ह्यातच तुझं कल्याण होईल, तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली.
पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतील. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्परपलंगावर बसविली. असं त्यानं तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं, राजाला आनंदी केला व आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या, तशा तुम्ही वागा. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्राद्ध पक्ष: तर्पण आणि पिंड दान म्हणजे काय, तुम्ही स्वतः ...

श्राद्ध पक्ष: तर्पण आणि पिंड दान म्हणजे काय, तुम्ही स्वतः ही कामे कशी करता, जाणून घ्या
तर्पण म्हणजे काय : तृप्त करण्याच्या क्रियेला तरपण म्हणतात. पूर्वजांना मोक्ष अर्पण ...

शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा कधी करू नये, जाणून घ्या कारण काय ...

शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा कधी करू नये, जाणून घ्या कारण काय आहे
भगवान शिव हे सर्वात प्रसन्न देवता मानले जातात. भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त ...

पितृ पक्ष : काय टाळावे जाणून घ्या

पितृ पक्ष : काय टाळावे जाणून घ्या
गृह कलह : श्राद्धात गृह कलह, स्त्रियांचा अपमान, संतानला कष्ट दिल्याने पितर नाराज ...

श्राध्द केले की कावळ्यासच का खाऊ घातले जाते.. या मागील ...

श्राध्द केले की कावळ्यासच का खाऊ घातले जाते.. या मागील शास्त्रीयदृष्ट्या हेतू
आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान"होते. माणसांच्या ...

आज लालबागच्या राजाचे विसर्जन, गणेश विसर्जनासाठी फक्त 10 ...

आज लालबागच्या राजाचे विसर्जन, गणेश विसर्जनासाठी फक्त 10 कार्यकर्त्यांना  परवानगी, बाप्पाच्या विसर्जनाचे नियम जाणून घ्या
आज अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन आहे. दहा दिवसांच्या पूजेनंतर आज गणेश भक्त अश्रूंनी ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...