सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. शीख धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:07 IST)

श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश

शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांच्या लहानपणाचे नाव गोविंद राय असे होते. वडील गुरु तेगबहादुरजी यांच्या नंतर ते वयाच्या नवव्या वर्षीच शिखांचे दहावे गुरु झाले. ते आध्यात्मिक गुरु असून निर्भयी योद्ध, कवी आणि दार्शनिक होते. 
 
शिखांसाठी 5 वस्तू केस, कंगवा, कडा, कच्छा आणि किरपान यांचा समावेश आहे. यांना पाच ककार असे म्हटले जाते आणि अमृत किंवा शीख-दीक्षा घेणार्‍या प्रत्येक शिखाने हे धारण करणे आवश्यक आहे. हे आदेश गुरु गोबिंद सिंग यांनीच दिले होते. 
 
अमृत किंवा शीख-दीक्षा प्रत्येक शिखाने घेणे आवश्यक आहे. दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना पाच क-वस्तू स्वतःकडे अहोरात्र बाळगाव्या लागतात. त्यांत केस (न कापलेले केस), कंगा (कंगवा), कडा (लोखंडी किंवा स्टीलचा कडा), कच्छा (लांब विजार), किरपान (तलवार) यांचा समावेश आहे. 
 
गुरु गोविंदसिंग यांनी संस्कृत, फारशी, पंजाबी, आणि अरबी भाषा शिकल्या होत्या. सोबतच त्यांना संपूर्ण शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. ते लेखक देखील होते आणि त्यांनी दसम ग्रंथ साहिब रचित केली होती. ते विद्वानांचे संरक्षक मानले जात होते. त्यांच्या दरबारात नेहमी 52 कवी आणि लेखकांची उपस्थिती राहत असे म्हणून त्यांना संत शिपाही असे म्हटले जात होते.