बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 2 मे 2011 (15:30 IST)

तोरण

साहित्य : एक किलो कोबी किवा श्रावणघेवडा, पाऊण किलो गाजर किवा मटार, एक नारळ ५/६ हिरव्या मिरच्या, २ टी स्पून जिरे, एक इंच आले, हळद, हिग, कढीपत्ता, मोहरी, चमचाभर उडीद डाळ, मीठ, तेल.

कृती : कोबी बारीक किसावा (मटार फक्त कोबी बरोबरच वापरावे.) तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, २ सुक्या लाल मिरच्या मोडून, कढीलिब, हिग, घालून फोडणी करावी. कोबी, मटार, थोडी हळद व मीठ घालावे. झाकण ठेवून भाजी छान वाफवावी. पाणी घालू नये. नारळ, हि. मिरच्या जिरे व आलं मिक्सरवर जाडसर कोरडेच वाटावे. वाटण भाजीत परतावे व परत २ मिनिटे वाफवावे. ही भाजी कोबी मटार, गाजर व घेवडा एकत्र वापरूनही करतात.