साहित्य : 2 वाट्या कणीक, 1/2 वाटी दही, 1/2 वाटी दूध, पाववाटी तूप, चवीसाठी मीठ व साखर, 1 चमचा यीस्ट, थोडे पनीर.
कृती : यीस्ट, साखर थोडे दूध एकत्र करा. कणकेत तूप, दही व यीस्ट (भिजवलेले) घालून एकजीव करा. गोळा करून झाकून ठेवा, 10 मिनिटाने फुगून दुप्पट झाल्यावर गोळे करून गॅसवर तवा ठेवून भाजून घ्या.
कृती : मक्याचे दाणे थोडे दूध घालून वाफवून घ्या व ठेचा. थोड्या तेलावर आलं-लसूण-मिचरी पेस्ट बारीक चिरलेला कांदा घालून परता. नंतर मका घालून परतून भाजलेल्या कुलचावर घालून वरून किसलेलं पनीर कोथिंबीर घालून खाण्यास द्यावे.