गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मुगाची भजी

ND
साहित्य : दोन वाट्या सालासहित मुगाची डाळ, 5-6 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा किसलेलं आलं, चिमूटभर हिंग, छोटा चमचा लाल तिखट, मीठ, तळण्यासाठी तेल, कोथिंबीर, हळद.

कृती : मुगडाळ 4-5 तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून त्यात आलं घालून ती वाटून घ्यावी. हिरव्या मिरच्या मोठ्या उभ्या चिरा. वाटलेल्या डाळीत मिरच्या, मीठ साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर, हळद, तीन चमचे गरम तेलाचे मोहन घाला व कालवून घ्या. चांगल्या तापलेल्या तेलात भजी तळा. सर्व्ह करताना भजी सोबत चटणी द्या.