बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मुगाचे पौष्टिक लाडू

ND
साहित्य : भाजलेल्या मुगाचे पीठ २ वाटी, साजूक तूप दीड वाटी, दूध अर्धा कप, साखर २ वाटी, बदामाचे काप, काजू-पिस्त्याचे काप, वेलची, लवंग-मिरी पावडर अर्धा टी. स्पून (एकत्रित)

कृती : प्रथम कढईत तूप घालून मुगाचे पीठ खमंग भाजून घ्यावे. भाजताना मधूनमधून दुधाचे हबके मारावेत. यामुळे पीठ रवाळ बनते. नंतर पीठ थंड झाल्यावर बारीक केलेली साखर, बदाम, काजू, पिस्ते यांचे काप वेलची-लवंग-मिरी यांची पावडर घालून पीठ एकत्रित करावे व मिश्रणाचे लाडू वळावेत.