गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

रंग बेरंगी ब्रेड

ND
साहित्य : 1 वाटी मुगाची डाळ 4 तास भिजत ठेवून त्याची पेस्ट करून घ्यावी. 1 मध्यम जुडी पालकाची - पालक स्वच्छ करून त्याचे देठ काढून घ्यावे व त्या पानांना स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करून घ्यावी, मीठ चवीनुसार, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट, 4 चमचे रवा, 8 स्लाइस ब्रेड.

कृती : ब्रेड सोडून बाकी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकजीव करून त्याचे मिश्रण तयार करावे. नॉन स्टिक तव्यावर थोडंसं तेल लावून त्यावर ब्रेडच्या स्लाइसला या मिश्रणात बुडवून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. चांगले भाजून झाल्यावर त्याचे चार काप करावे व टोमॅटोच्या चटणी सोबत सर्व्ह करावे. मुलांना लंच बॉक्समध्ये देण्यासारखा पौष्टिक पदार्थ आहे.