साहित्य : 1 कप उदीड डाळ धुतलेली, 1 कापलेला कांदा, 1 मोठा चमचा तेल, 3/4 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 2 मोठी वेलची, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरलेले टोमॅटो, 1/2 चमचा गरम मसाला.
कृती : डाळ धुऊन चार कप पाण्यात हळद व मिठासोबत शिजवावे आणि गाळून पाणी वेगळे करावे. तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी मग वेलची एक मिनिट फ्राय करावे. कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतावे. मग डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला घालून तीन-चार मिनिट कमी आंचेवर शिजवावे आणि उतरवून पोळी सोबत सर्व्ह करावी.