साहित्य : मूग डाळ- पाव किलो, गूळ- अर्धा किलो, तांदूळ- १०० ग्रॅम, एका मध्यम नारळाचा रस, वेलची, सुका मेवा, चवीपुरतं मीठ.
कृती : प्रथम मुगाची डाळ शिजवून घ्यावी. तांदूळ धुवून घ्यावेत. ते थोडे सुकले की भाजावेत व नंतर मिक्सरमध्ये त्याचा बारीक सरसरीत रवा होईपर्यंत वाटावं. १ लिटर पाण्यामध्ये रवा शिजवून घ्यावा, त्यामध्ये शिजवलेली मूगडाळ, गूळ, खोबऱ्याचा रस घालून शिजवून घ्यावं व शेवटी चवीपुरतं मीठ घालावं. सव्र्ह करताना वरती वेलची, सुका मेवा घालवा.