गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

व्हेज हाक्का नूडल्स

ND
साहित्य : 200 ग्रॅम हाक्का नूडल्स शिजवून घेतलेले, तीन चमचे तेल, चार लाल सुक्या मिरच्या बारीक करून, 15-20 लसूण पाकळ्या
बारीक चिरलेल्या, एक कप लांब चिरलेला कोबी, लांब पातळ कापलेली सिमला मिरची, कांदे, 1/2 कप बीन्सचे लांब पातळ तुकडे, अर्धा कप गाजर लांब पातळ तुकडे, दोन चमचे सोया सॉस, चवीनुसार मीठ.

कृती : कढईत तेल तापवून प्रथम लसूण व लाल मिरचीचे तुकडे परतून घ्यावे. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या व चिरलेला कांदा घालून मोठ्या आचेवर भरभर चार-पाच मिनिट परतावे. नंतर नूडल्स, मीठ व सोया सॉस घालून परतून घ्यावे. मोठ्या बाऊलमध्ये गरमागरम नूडल्स काढून त्यावर कांद्याची हिरवी पाने बारीक चिरून सर्व्ह करावे.