तीन सुवर्णपदकं जिंकून बोल्टची हॅटट्रिक
जमैकाच्या उसेन बोल्टनं सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून हॅटट्रिक साजरी केली. . अशी कामगिरी करणारा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदकं जिंकणारा उसेन बोल्ट हा चौथा खेळाडू ठरला आहे. बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या संघानं फोर बाय हंड्रेड मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या खात्यात आता नऊ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग, 2012 सालच्या लंडन आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटरचं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.