फेडरर, मरे, अझारेन्का, शारापोव्हाची आगेकूच
वर्षातील चौथी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपनला सोमवारी सुरुवात झाली आणि स्पर्धेचा अव्वल मानांकित रॉजर फेडरर, ब्रिटनचा अँडी मरे, महिलांमध्ये अव्वलस्थानी असलेली व्हिक्टोरिया अझारेन्का, मारिया शारापोव्हा, चीनची ली ना यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवून आपल्या अभियनाची सुरुवात थाटात केली. आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ सेटमध्ये पराभूत करून त्यांनी दुसर्या फेरीत प्रवेश केला.