शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोनिकाकडे

नवी दिल्ली- स्पेनमधील व्हॅलेन्सिला येथे 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या पाच देशांच्या कनिष्ठ महिला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 20 खेळाडूंचा भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची घोषणा दिली असून स‍ोनिकाकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी रस्मिता मिंझकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले असून दिव्या थेपे आणि सोनल मिंझ या दोन गोलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. रितू, गगनदीप कौर, महिला चौधरी, अस्मिता बर्ला आणि सलिमा टेटे यांचा समावेश आहे. मध्यफळीची जबाबदारी मनप्रित कौर, नवनीत कौर आणि नवप्रित कौर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 
या स्पर्धेत जर्मनी, इंग्लंड, स्पेन आणि बेल्जियम या चार देशांचा सहभाग राहणार आहे.