1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: ओहिओ , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (12:52 IST)

सेरेनाने सिनसिनाटी स्पर्धा जिंकली

अमेरिकेची जगात अव्वलस्थानी असलेली टेनिसपटू सेरेना विलियम्स हिने प्रथमच हार्डकोर्टवरील सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
 
सिनसिनाटीने सेरेनाला यापूर्वी नेहमीच चकवा दिला आहे. अखेर या स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालण्यात सेरेनाला प्रथमच यश मिळाले आहे. तिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाची आव्हानवीर अँना इव्हानोविच हिच्यावर 6-4, 6-1 अशी सरळ दोन सेटसमद्ये मात केली.
 
सेरेनाला हा अंतिम सामना जिंकण्यासाठी 62 मिनिटाचा वेळ लागला. मागील वर्षापर्यंत सेरेना सिनसिनाटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकली नव्हती. तिने या सामन्यात इव्हानोविकचा प्रतिकार मोडीत काढला. विलियम्सचे हे या ऑगस्ट महिन्यातील दुसरे विजेतेपद ठरले. 25 ऑगस्टपासून न्यूयॉर्क येथे अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी सेरेनाने केली आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ही या वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. सेरेनाने उपान्त्य सामन्यात करोलिन वुझनिाकी हिचा तीन सेटसमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. पहिला सेट गमवल्यानंतरही तिने विजय मिळविला. इव्हानोविकने मारिया शारापोव्हाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.