शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (17:08 IST)

All India Senior Ranking tournament: मालविका आणि मिथुन यांनी वरिष्ठ रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

मालविका बनसोड आणि मिथुन मंजुनाथ यांनी अखिल भारतीय वरिष्ठ रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेतील महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. गुरुवारी येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय मानांकित मालविका बनसोड आणि आठव्या मानांकित मिथुन मंजुनाथ यांनी सरळ गेममध्ये विजय मिळवला. रोहन कपूर आणि संजना संतोष या मिश्र दुहेरीच्या जोडीने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. मालविकाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित आणि वरिष्ठ रँकिंग टूर्नामेंट विजेत्या आकर्षि कश्यपचा 42 मिनिटांत 21-15, 21-9 असा पराभव केला. मिथुनने माजी जागतिक ज्युनियर नंबर वन आदित्य जोशीचा 21-15, 21-4 असा पराभव करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आदित्यने पात्रतेपासून अंतिम फेरीपर्यंत आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले.