शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (11:42 IST)

Asian Snooker Championship: पंकज अडवाणी गटात अव्वल, नॉकआऊट साठी पात्र

माजी चॅम्पियन पंकज अडवाणी मंगळवारी अ गटात अव्वल स्थानी राहिल्यानंतर आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपच्या नॉकआऊट फेरीसाठी पात्र ठरले. अडवाणीने नुकताच विश्वविजेता पाकिस्तानच्या एहसान रमजानचा 4-1असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या फ्रेममध्ये एहसानने आघाडी घेतली पण अडवाणीने ती 73-38 अशी जिंकली. दुसऱ्या फ्रेममध्ये पंकजने 50 गुणांच्या ब्रेकसह 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर एहसानने पुढच्या फ्रेममध्ये 58 च्या ब्रेकसह 1-2 अशी बरोबरी साधली, परंतु अडवाणीने 102 गुणांच्या शतकी ब्रेकसह 3-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये अडवाणीने 44 गुणांचा ब्रेक घेत आघाडी घेतली, पण एहसानने माघार घेतली. शेवटी अडवाणीने पाचवी फ्रेम जिंकून सामना जिंकला.