बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 29 जानेवारी 2020 (17:38 IST)

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिची बहीण चंद्रांशु हिच्यासह राजकारणाच्या कोर्टात भाजपमध्ये सामील झाली

बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल सत्ताधारी भारतीय भारतीय जनता पक्षा (BJP)मध्ये दाखल झाली आहे. सायना नेहवाल तिची बहिण  चंद्रांशु नेहवाल हिच्यासमवेत भाजपमध्ये दाखल झाली. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सायना म्हणाली, "आज मी अशा पक्षामध्ये सामील झाले जे देशासाठी बरेच काही करते. नरेंद्र मोदी दिवस-रात्र देशासाठी खूप कष्ट करतात. सध्या माझ्यासाठी सर्व काही नवीन आहे, परंतु मला सर्वकाही आवडत आहे. नरेंद्र सरांनी खेळाला प्रोत्साहन दिले, खेलो इंडियासारख्या प्रोत्साहनासाठी काम करण्यास सुरवात केली. "ती म्हणाली," मी खूप मेहनती आहे. मला मोदीजींसह देशासाठी काहीतरी करायचे आहे. मला राजकारण आवडते खेलो इंडियाकडून तरुणांना खेळायची संधी मिळाली. मी मोदीजींनी खूप प्रेरित आहे.
 
हरियाणामध्ये जन्मलेली 29 वर्षीय सायना नेहवाल ही भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे, तिची फॅन फॉलोव्हिंग फार जास्त आहे. बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्यास्थानी राहिलेल्या सायनाला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत सायनाने एकूण 24 आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंकले आहेत. त्याचबरोबर लंडन ऑलिंपिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. 2009 मध्ये ती जगातील दुसर्‍या क्रमांकाची आणि 2015 साली जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू ठरली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत त्यांच्या ट्विटद्वारे सायना नेहवाल हिचा भाजपकडे कल असल्याचे दिसून आले आहे. 2015 मध्ये सायनाने आपले एक रॅकेट पीएम मोदींना सादर केले, जेव्हा ती जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत प्रथम आली. ती म्हणाले की, “मी वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळलेला रॅकेट सादर केला. मोदींनी ते मान्य केले आणि पंतप्रधान म्हणून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तूंमध्ये ते ठेवणार असल्याचे सांगितले.''