शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (09:53 IST)

क्रिस्टियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेडमध्ये परती, जुव्हेंटस सोडून जुन्या क्लबमध्ये परतला

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटसला निरोप दिला आहे.रोनाल्डो 12 वर्षांनंतर मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला.मँचेस्टर युनायटेडने शुक्रवारी याची घोषणा केली.युनायटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, मँचेस्टर युनायटेडने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्थानांतरणासाठी जुव्हेंटसशी करार केला आहे याची पुष्टी करण्यात आनंद होत आहे.
 
मँचेस्टर युनायटेड पुढे म्हणाले की क्लबमधील प्रत्येकजण ख्रिस्तियानोचे मँचेस्टरमध्ये पुन्हा स्वागत करण्यास उत्सुक आहे. आधी संभाव्य व्यक्त केले जात होते की रोनाल्डो मँचेस्टर सिटीला जाऊ शकतो पण त्याने मँचेस्टर युनायटेडला जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी, युव्हेंटसचे प्रशिक्षक म्हणाले की क्रिस्टियानो रोनाल्डोचा युव्हेंटसमध्ये राहण्याचा कोणताही हेतू नाही. एलेग्रीने एम्पोलीविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत सांगितले की, रोनाल्डोने त्याला गुरुवारीजुव्हेंटस सोडण्याची इच्छा सांगितली. अलेग्री म्हणाले, 'काल क्रिस्टियानोने मला सांगितले की तो यापुढे जुव्हेंटसकडून न खेळण्याची योजना आखत.आहे.' 
 
रोनाल्डो इन्स्टाग्रामवर म्हणाला, 'आज मी एक आश्चर्यकारक क्लब सोडत आहे, जो इटलीतील सर्वात मोठा क्लब आहे आणि निश्चितच संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठा क्लब आहे. मी जुव्हेंटससाठी माझे हृदय आणि आत्मा समर्पित केली आणि माझ्या शेवटच्या दिवसांपर्यंत माझे त्याच्यावर प्रेम असेल .टिफोसी बियानकोनेरी नेहमीच माझा आदर केला आणि मी  प्रत्येक हंगामात, प्रत्येक स्पर्धेत त्याच्यासाठी लढून त्या सन्मानाचे आभार मानण्याचा प्रयत्न केला.
 
 युनायटेडने जुव्हेन्टसला 28 दशलक्ष युरोची ऑफर दिली आहे. रोनाल्डोने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीची सुरुवात 2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसोबत केली आणि 2009 पर्यंत ते त्याच्याशी जुडलेले होते. त्यांनी 292 सामन्यांमध्ये 118 गोल केले आहेत. त्याच्या नावावर तीन प्रीमियर लीग जेतेपदे, एक एफए कप आणि दोन लीग कप आहेत.जुव्हेंटसच्या आधी रोनाल्डो स्पॅनिश क्लब रियल मेड्रिडमध्ये खेळत असे.