शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (15:25 IST)

FIH प्रो लीगचे सामने प्रेक्षकां शिवाय कटकमध्ये खेळले जातील

स्पेन विरुद्ध भारतीय पुरुष आणि महिला संघांचे FIH प्रो लीगचे होम सामने 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. कलिंगा स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. 
 
हॉकी इंडियाने सांगितले की, "हे सामने केवळ टीव्हीवर पाहता येतील कारण हॉकी इंडिया आणि एफआयएचने प्रेक्षकांशिवाय त्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे." 
 
त्यानंतर भारतीय संघ 19 आणि 20 मार्चला अर्जेंटिनाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 2 आणि 3 एप्रिल रोजी भारतीय महिला आणि पुरुष संघ इंग्लंडचे यजमानपद भूषवतील. 
 
मार्चनंतर होणाऱ्या सामन्यांच्या परिस्थितीचा फेब्रुवारीच्या अखेरीस आढावा घेतला जाईल, असे महासंघाने म्हटले आहे.