बेंगळुरू ओपन टेनिस मध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व,तीन दुहेरी जोड्या उपांत्यपूर्व फेरीत
जीवन नेदुंचेझियान आणि पुरव राजा या अव्वल मानांकित भारतीय जोडीने बेंगळुरू ओपनच्या दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने या सामन्यात क्रोएशियाच्या बोर्ना गोजो आणि बल्गेरियाच्या दिमितार कुझमानोव्ह यांच्यावर 6-4, 6-7,10-8 असा विजय नोंदवला. याशिवाय रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी आणि विष्णुवर्धन या भारतीय जोडीनेही स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
रामकुमार आणि मीनेनी या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत फारसा संघर्ष करावा लागला नाही. त्याने जर्मनीच्या मार्कोस कालोवेलोनिस आणि जपानच्या तोशिहिदे मात्सुई यांचा 6-3 6-3 असा पराभव केला.
बालाजी आणि वर्धन यांनी मॅथियास बोर्गे (फ्रान्स) आणि किमर कोप्पाजेन्स (बेल्जियम) या जोडीला हरवण्यासाठी थोडा संघर्ष केला. भारतीय खेळाडूंनी 6-4 4-6 10-3 असा विजय मिळवला. दरम्यान, भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनची झेकच्या अव्वल मानांकित जिरी वेसेलीशी लढत होईल.