गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:49 IST)

भारतीय फुटबॉल संघाने 8 व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली, सुनील छेत्रीने लिओनेल मेस्सीशी बरोबरी केली

भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा 3-0 असा पराभव करत 8 वी वेळ ही स्पर्धा जिंकली. संघासाठी कर्णधार सुनील छेत्री, सुरेश सिंग आणि अब्दुल समद यांनी गोल केले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात गोल करण्याबरोबरच कर्णधार सुनीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे. 
 
भारतीय संघाच्या कर्णधाराने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 गोल केले आहेत. मेस्सीने आतापर्यंत तितकेच गोल केले आहेत. ज्या वेळी भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात यजमान मालदीवचा पराभव केला होता, तेव्हा छेत्रीने ब्राझीलच्या दिग्गज पेलेला मागे टाकले होते. सामन्याच्या 49 व्या मिनिटाला सुनीलने अंतिम सामन्यातील पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सुरेशने 50 व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी 2-0 अशी केली. यानंतर सामन्याच्या 90 व्या मिनिटाला अब्दुलने आणखी एक शानदार गोल करत टीम इंडियाची आघाडी 3-0 अशी केली. पूर्वार्धात भारतीय संघाने नेपाळवर वर्चस्व गाजवले, पण संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये संघाने  एकतर्फी लढतीत नेपाळचा  3-0 ने पराभव केला