भारतीय फुटबॉल संघाने 8 व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली, सुनील छेत्रीने लिओनेल मेस्सीशी बरोबरी केली

football
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (15:49 IST)
भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा 3-0 असा पराभव करत 8 वी वेळ ही स्पर्धा जिंकली. संघासाठी कर्णधार सुनील छेत्री, सुरेश सिंग आणि अब्दुल समद यांनी गोल केले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात गोल करण्याबरोबरच कर्णधार सुनीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधाराने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 गोल केले आहेत. मेस्सीने आतापर्यंत तितकेच गोल केले आहेत. ज्या वेळी भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात यजमान मालदीवचा पराभव केला होता, तेव्हा छेत्रीने ब्राझीलच्या दिग्गज पेलेला मागे टाकले होते. सामन्याच्या 49 व्या मिनिटाला सुनीलने अंतिम सामन्यातील पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सुरेशने 50 व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी 2-0 अशी केली. यानंतर सामन्याच्या 90 व्या मिनिटाला अब्दुलने आणखी एक शानदार गोल करत टीम इंडियाची आघाडी 3-0 अशी केली. पूर्वार्धात भारतीय संघाने नेपाळवर वर्चस्व गाजवले, पण संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये संघाने
एकतर्फी लढतीत नेपाळचा
3-0 ने पराभव केला


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

तेरवीला निघालेल्या कुटुंबाचा अपघात

तेरवीला निघालेल्या कुटुंबाचा अपघात
चंद्रपूर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा पिंपळनेरी खापरी मार्गावर भिषण अपघात ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर ...

एलआयसी पॉलिसी पॅनशी कशी जोडावी? ही संपूर्ण प्रक्रिया आहे

एलआयसी पॉलिसी पॅनशी कशी जोडावी? ही संपूर्ण प्रक्रिया आहे
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एलआयसीने ...

राज्यात 7 हजार 151 रुग्ण अॅक्टिव्ह

राज्यात 7 हजार 151 रुग्ण अॅक्टिव्ह
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काहींसा चढ-उतार ...

संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल असे वाटले होते ...

संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल असे वाटले होते : भुजबळ
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. ...