शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (19:41 IST)

Paris Olympics: नेमबाज रुद्राक्ष पाटील बनला विश्वविजेता, सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले

भारताचा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) कैरो येथे झालेल्या नेमबाजी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तो 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत चॅम्पियन ठरला. दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रासोबत अशी कामगिरी करणारा रुद्राक्ष पाटील हा दुसरा भारतीय नेमबाज आहे. या विजयासह पाटील यांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळाले. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा आहे.
 
18 वर्षीय रुद्राक्ष पाटीलने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला. एका क्षणी तो अंतिम सामन्यात पिछाडीवर होता, पण नंतर त्याने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिकसाठी चार कोटा उपलब्ध आहेत. भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या सापळ्यातील पहिला कोटा भौनीश मेंदिरत्ता द्वारे मिळवला.
 
रुद्राक्षने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते आणि क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहून ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने 2006 मध्ये क्रोएशियातील झाग्रेब येथे 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विजेतेपदाचे सुवर्णपदक जिंकले.

Edited By - Priya Dixit