शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (16:05 IST)

पीएम मोदींनी सानियाला विचारले -टेनिस चॅम्पियन होण्यासाठी कोणते गुण असणे आवश्यक आहेत,असे उत्तर टेनिस स्टारने दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडूंसह व्हर्च्यूवल बैठक घेतली.या दरम्यान,मोदींनी खेळाडूंच्या तयारीचा आढावा घेतला आणि त्यांच्याशी खेळाविषयीही विचारपूस केली. 
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.संभाषणा दरम्यान पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहनही दिले. खेळाडूंनी पंतप्रधानांशी संवाद साधून आपले मत व्यक्त केले. या दरम्यान पंतप्रधानांनी देशातील महिला टेनिस स्टार सानिया मिर्झाशी संभाषणे केली.या बैठकीत पंतप्रधानांनी सानियाला विचारले की टेनिस चॅम्पियन होण्यासाठी खेळाडूंमध्ये  कोणते गुण असले पाहिजेत. 
 
संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी सानियाला म्हटले, 'सानिया जी नमस्ते, सानिया जी, आपण बरीच ग्रँड स्लॅम पदे जिंकली आहेत आणि मोठ्या खेळाडूंशीसुद्धा खेळल्या आहात.आपल्या मते टेनिसचा चॅम्पियन होण्यासाठी कोणते गुण असावेत? आजकाल मी पाहिले आहे की छोट्या शहरांमधील राहणाऱ्या लोकांसाठी आपण नायक आहात आणि त्यांना देखील टेनिस शिकायचे आहे. 
 
सानियाने असे उत्तर दिले की,'जी, सर टेनिस हा एक जागतिक खेळ आहे आणि जेव्हा मी 25 वर्षांपूर्वी खेळायला सुरवात केली तेव्हा त्यावेळी बरेच लोक टेनिस खेळत न्हवते. परंतु आज अशे बरेच मुले आहेत ज्यांना टेनिस रॅकेट उचलायचे आहे.आणि त्यांना या मध्ये व्यावसायिक व्हायचे आहे. टेनिसमध्ये ज्यांना असा विश्वास आहे की ते एक मोठे  खेळाडू होऊ शकतात. त्यांना या साठी कठोर परिश्रम, समर्थन आणि समर्पण आवश्यक आहे. 25 वर्षांपूर्वी आणि आताच्या तुलनेत बऱ्याच सुविधा मिळायला सुरवात झाली आहे, बरीच स्टेडियम बांधली जात आहेत. 
 
येत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सानिया अंकिता रैनाबरोबर जोडीने कोर्टात दाखल होणार आहे. पंतप्रधानांनी अंकिताच्या तयारीबद्दल विचारले असता सानिया म्हणाली, 'अंकिता एक तरुण खेळाडू आहे आणि ती खूप चांगली खेळत आहे.आम्ही मागील वर्षी फेड कपमध्ये एकत्र खेळलो होतो आणि आम्ही चांगली कामगिरी केली.अंकिता चे पहिले आणि माझे हे चवथे ऑलिंपिक आहे,त्यामुळे मला वाटते की ती संघात एक नवीन उर्जा आणू शकेल. 
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आपल्याला जास्त दबाव घेण्याची गरज नाही,आपण आपले 100 टक्के द्या ते म्हणाले की,संपूर्ण भारत आपल्या पाठीशी आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे आणि भारताचे पहिले पथक 17 जुलै रोजी जाणार आहे. 
 
एअर इंडियाने टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताची पहिली तुकडी जाणार.भारतातील 120 हून अधिक खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शविली आहे.भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अद्याप खेळाडूंची संख्या अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.पीव्ही सिंधू आणि बजरंग पुनियाकडून भारताला सुवर्णपदकाच्याआशा आहेत. सिंधू रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकासह आली.यावेळी ऑस्ट्रेलियाकडून 472 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत.