बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2017 (15:02 IST)

कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या विरोधात पोलिसांत तक्रार

कुस्तीपटू सुशील कुमार याच्या विरोधात मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेसलर प्रवीण राणा आणि त्याचा भाऊ नवीन राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

कॉमनवेल्थ गेम्स आणि सीनियर एशियन रेसलींग चॅम्पीयनशिपसाठी दिल्लीच्या केडी जाधव स्टेडीयमवर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ट्रायल दरम्यान, प्रवीण राणा आणि सुशील कुमार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या वादातूनच सुशीलकुमारविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

याबाबत डीसीपी सेंट्रल एम.एम. रंधावा यांनी सांगितले की, सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांमध्ये FIR दाखल करणयात आली आहे. पोलिसांनी भा.दं.सं. 323 आणि 341 अन्वये सुशील कुमार याच्याविरोदात तक्रार दाखल केली आहे.