शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (17:47 IST)

राफेल नदाल कोरोना पॉझिटिव्ह, स्वतः ट्विट करून खुलासा केला

दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो नुकताच दुखापतीमुळे अबुधाबीत आयोजित एग्जीबिशन इव्हेंटमध्ये खेळून परतला होता. राफेल नदालने स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एग्जीबिशन इव्हेंटमध्ये त्याला माजी नंबर 1 खेळाडू अँडी मरेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. अँडी मरेने राफेल नदालचा 6-3, 7-5 असा पराभव केला.

त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल. यासोबतच नदालने सांगितले की, तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि भविष्यातील कार्यक्रमांबद्दल पुढील माहिती देत ​​राहील. त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आणि लिहिले, तुमच्या पाठिंब्याबद्दल आगाऊ धन्यवाद.
 
नदाल गेल्या 4 महिन्यांत पहिला सामना खेळला. तो अँडी मरेविरुद्धचा सामना सलग सेटमध्ये हरला. पायाच्या दुखापतीमुळे तो टेनिस कोर्टपासून दूर होता. ऑगस्टपासून तो एकही सामना खेळला नव्हता. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉइड हॅरिसविरुद्ध तो पराभूत झाला. विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक आणि यूएस ओपनमध्येही तो खेळला नाही.